Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (17:19 IST)
लालूप्रसाद म्हणाले 'चक दे रेल्वे'
'गोल पर गोल दाग रहै है हम, हर मॅच मे देश का बच्चा बच्चा बोले चक दे रेल्वे'
लालूप्रसाद यादव यांनी आज भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीचा आलेख मांडताना तो या शब्दांत मांडला. रेल्वेच्या नफ्याला सुरक्षित ठेवून रेल्वेत जे बदल घडवायचे आहेत, त्यासाठी या नफ्यातील पैसेच विस्तारासाठी वापरण्यात येत आहेत, असे सांगून रेल्वेच्या प्रकल्पासाठी खर्च केली जाणारी रक्कम गेल्या चार वर्षांत तेरा हजाराहून तीस हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी 'नयी कथनी. नयी करनी. नयी एक सोच लाये हैं. तरक्की की नयी पारसमणी हम खोज लाये हैं' या शब्दांत त्यांनी याचे वर्णन केले.
लालूप्रसाद रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वे नफ्यात आली आहे. यामुळे काही लोक अचंबित झाले आहेत. आपल्या यशाचे वर्णन करताना ते म्हणाले, जब कह रहे हैं. हमने गजब काम किया है. करोडों का मुनाफा हर एक शाम दिया है. फल सालों ये अब देगा. पौधा जो लगाया है. सेवा का. समर्पण का. हर फर्ज निभाया है.