संबंधित माहिती
- Ridge Gourd या प्रकारे बनवा दोडक्याची भाजी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील
- घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!
- Tomato Pakora फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत टोमॅटोची जाळीदार भजी; पाहा सोपी रेसिपी
- पाहुणे मंडळींसाठी झटपट नाश्ता; बनवा चविष्ट पालक भजी
- डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी
भजीसोबत ही चटणी खाल्ली तर चव दुप्पट
गरमागरम भजीसोबत जर पुदिना-कोथिंबीर आणि दह्याची हिरवी चटणी किंवा आंबट-गोड चिंचेची चटणी असेल, तर भजी खाण्याची चव खरोखरच दुप्पट होते. भजीची चव वाढवणाऱ्या दोन सर्वात लोकप्रिय चटण्यांच्या सोप्या रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
हॉटेल स्टाईल हिरवी चटणी (पुदिना-कोथिंबीर चटणी)
ही चटणी भजीसोबत अतिशय चटपटीत आणि ताजी चव देते.
साहित्य-
१ कप ताजी कोथिंबीर
अर्धा कप पुदिना पाने
२-३ हिरव्या मिरच्या (तिखटपणा आवडीनुसार)
४-५ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले
२ मोठे चमचे घट्ट दही (यामुळे चटणीला छान क्रीमी टेक्सचर आणि हलका आंबटपणा येतो)
१ चमचा लिंबाचा रस
चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरेपूड
कृती-
दही सोडून इतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून बारीक वाटून घ्या. चटणी वाटून झाल्यावर त्यात दही घाला आणि मिक्सर फक्त १ सेकंद फिरवून घ्या. तुमची हॉटेल सारखी फिकट हिरवी चटणी तयार आहे.
आंबट-गोड चिंच-खजुराची चटणी
विशेषतः कांदा भजी किंवा बटाटा भजीसोबत ही चटणी अप्रतिम लागते.
साहित्य-
अर्धा कप चिंच (बिया काढलेली)
अर्धा कप खजूर (बिया काढलेली)
अर्धा कप गूळ
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा जिरेपूड
अर्धा चमचा संंधव मीठ (Black salt) आणि साधे मीठ
कृती-
चिंच आणि खजूर १ कप पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ते पाण्यातच थोडे उकळून घ्या जेणेकरून ते मऊ होईल. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला लावून बारीक करा आणि गाळणीने गाळून घ्या. आता या पल्पमध्ये गूळ, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ टाकून मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून चटणी घट्ट होईल.
चटणीसोबतच भजीची चव आणखी वाढवायची असेल, तर हिरव्या मिरच्यांना मध्येच उभी चीर देऊन तेलात तळून घ्या आणि त्यावर थोडे मीठ व चाट मसाला भुरभुरा. भजी आणि तळलेली मिरची हे समीकरण बेत अधिकच रंगतदार बनवते!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
