Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 7 ऑक्टोबर 2010 (08:47 IST)
आज 35 सुवर्णपदकांसाठी झुंज
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग दोन दिवस भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत. आज 35 सुवर्णपदकांसाठी सामने होत आहेत.
भारत पदक तालिकेत दुसर्या क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी भारताला आज सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करावी लागणार आहे.
यापूर्वी दोन दिवस भारताने वेटलिफ्टींग, मेनबाजीत सुवर्णमयी कामगिरी केली आहे. आज तिरंदाजी, सायकलिंग, जिमनॅस्टीक,नेमबाजीच्या स्पर्धा होत असून, यात भारतीयांचे पारडे जड मानले जात आहे.