Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 4 ऑक्टोबर 2010 (14:55 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची विजयी सुरुवात
दिल्लीत भरलेल्या कॉमनवेल्थ गेम्सना आजपासून सुरुवात झाली आहे. भारताच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी करत विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या रोहन बोपन्नाने एकेरी गटात युगांडाच्या बुइन्जाचा पराभव करत विजयी सुरुवात केली.
बोपन्नाने या सामन्यात बुइन्झाचा 6-1,6-4 असा पराभव केला. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसर्या सेटमध्ये मात्र बोपन्नाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुसर्या सेटमध्ये त्याला प्रतिस्पर्ध्याकडून चांगलेच आव्हान मिळाले होते.