गेम्समध्ये आज 8 गोल्ड मेडल
कॉमनवेल्थला शानदार समारंभाने सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी आठ गोल्डमेडल्ससाठी जगभरातील संघ आमने-सामने आहेत.भारतीय चमूला अधिक आशा असून, काही मेडल भारताच्या खात्यात पडण्याची शक्यता आहे. आज महिला वेट लिफ्टिगचा सामना होत असून, या स्पर्धेत भारतीय संघ मजबूत मानला जातो. दुपारी दोन वाजेपर्यंत याचा निर्णय लागणार आहे. पुरुष वेटलिफ्टिंग स्पर्धाही आजच घेतली जात आहे. यासह आणखी काही स्पर्धा आज घेतल्या जात असून, यात भारतीय संघ मजबूत मानला जात आहे.