Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 5 ऑक्टोबर 2010 (08:58 IST)
पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा
कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या दिवशी चार सुवर्ण पदक पटकावत कांगारुंनी पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पोहण्याच्या शर्यतीत कांगारुंना सर्वाधीक पदकं मिळाली आहे. या स्पर्धेत त्यांना भारतीय चमूने चांगलीच झुंज दिली. पामर या ऑस्ट्रेलियन खेळाडूने पहिले सुवर्ण पदक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.