शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 4 ऑक्टोबर 2010 (15:07 IST)

महिला टेबल टेनिस संघाचा विजयी शुभारंभ

टेनिस पाठोपाठ भारतीय महिला टेबल टेनिस संघानेही पहिल्याच दिवशी भारतीय संघाला विजयी सुरुवात करुन दिली आहे. महिला संघाने ग्रूप बीच्या सामन्यात श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला.

पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या शामिनी कुमारसेने विथांगे गोनापिनुवालाचा 11-9,11-9,11-7 असा पराभव केला.

दुसर्‍या सामन्यात मौमा दासने बादू मानिकूचा 11-14,11-5,11-4 असा पराभव करत भारताचा विजय निश्चित केला, तर तिसर्‍या व अंतिम सामन्यात पौलमी घटकने काविंदी सहाबंदुचा पराभव करत या स्पर्धेत भारताचे वर्चस्व सिद्ध केले.