Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (13:38 IST)
सोमदेव क्वाटर फायनलमध्ये
बुधवारीही विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. अचूक नेम साधणार्यां नेमबाजांप्रमाणेच भारतीय टेनिस खेळाडूही शानदार कामगिरी करत आहे. आज झालेल्या सामन्यात श्रीलंकन खेळाडूचा पराभव करत सोमदेव देवबर्मनने क्वाटर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
त्याने श्रीलंकेच्या अमरेश जयविक्रमेचा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासूनच देवबर्मनने सामन्यावर आपला दबदबा ठेवला होता.
त्याने अमरेशला एकही सेट जिंकण्याची संधी दिली नाही. केवळ 41 मिनिटांमध्ये देवबर्मनने सलग दोन सेट जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.