Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (15:45 IST)
अनिसाचे दुसरे सुवर्णपदक, राहिला रौप्य
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज घेण्यात आलेल्या 25 मीटर पिस्तूल शुटिंग स्पर्धेत पुन्हा एकदा भारताचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अनिसा सईदने आजही चमकदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली तर, राही सरनौबतनेही रौप्य पदक पटकावत भारताचा मान उंचावला आहे.
मंगळवारीही या जोडीने भारतातर्फे चमकदार खेळ करत सुवर्णपदक मिळवून दिले होते. आज झालेल्या वैयक्तीक स्पर्धेत राही व अनिसाने शानदार खेळ केला.
अनिसाने आज 786 गुण पटकावत नवीन विक्रमही नोंदवला आहे. सुरुवातीपासूनच या सामन्यात या दोन भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला होता.