शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाकची बंडखोरी!

कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे. याच कारणामुळे आता पाक संघाने कुरापत काढत खेळावर बहिष्कार टाकण्‍याची धमकी दिली आहे. पाक टीममध्ये यावरुन वाद सुरु झाला आहे.

उद्घाटन समारोहात पाकचा राष्ट्रध्वज कोणता खेळाडू धरणार यावरुन पाक संघात बंडखोरी झाली आहे. वेटलि‍फ्टर संघाने खेळ सोडून मायदेशी जाण्‍याची धमकी दिली आहे.

उद्घाटन समारोहात पाक वेटलिफ्टर शुजाउद्दीन मलिक राष्ट्रध्वज हातात घेऊन पुढे जाणार हे निश्‍चित करण्‍यात आले होते. अचानक कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर टीम लीडर मुहंम्मद अली शाह याने राष्‍ट्रध्वज आपण घेणार असल्याचे जाहीर करत मलिकल मागे होण्यास सांगितले. आता या प्रकरणावरुन पाक संघात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.