भारतीय हॉकी संघाचीही विजयी सुरुवात
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय हॉकी संघानेही विजयी सुरुवात केली आहे. पूल-एच्या आपल्या पहिल्याच सामन्यात हॉकी संघाने मलेशियाचा 3-2 असा पराभव करत पुढल्या फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भरत चिकाराने 67 व्या मिनिटांना गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून धनंजय महाडिक व संदिप सिंह यांनी गोल केले होते. अखेरचा गोल चिकाराने केला. भारताची संरक्षण फळी या सामन्यात पुन्हा एकदा फेल ठरली असली तरी अखेरच्या क्षणी आक्रमक खेळ करण्याचा फायदा संघाला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.