विश्वास-अविश्वासाचे प्रगती पुस्तक
भारतीय राज्य घटनेने विरुध्द पक्षाच्या हातात अविश्वास प्रस्तावाचे शस्त्र दिले आहे. या शस्त्राचा अनेकदा वापरही केला गेला आहे.
भारतीय राजकारणात पहिला अविश्वास प्रस्ताव पंडीत जवाहरलाल नेहरू सरकार विरुध्द ऑगस्ट 1963 मध्ये समाजवादी नेता आचार्य कृपलानी यांनी आणला होता.लाल बहादूर शास्त्री आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारविरुध्दही 3-3 वेळा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.आतापर्यंत सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या विरोधात 15 वेळा दाखल झालेला आहे.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरुध्द पहिला अविश्वास प्रस्ताव 1967 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनीच आणला होता.आतापर्यंत 25 वेळा विरुध्द पक्षांतर्फे पंतप्रधानांवर अविश्वास प्रस्ताव सादर केला गेला आहे.