शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By भाषा|

विश्वास ठरावावर चर्चासत्र वाढवण्यात यावे:भाजप

विश्वासमत ठरावावर चर्चेसाठी संसदेचे विशेष सत्र आणखी एक दिवसाने वाढवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासमत ठराव मांडून चर्चेस सुरूवात केली.

लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी विशेष सत्रात सभागृहाच्या कामकाजाबाबत सदस्यांना अवगत करण्यासाठी समागृह नेत्यांनी बैठक बोलावली होती. भाजपचे नेते व्ही के मल्होत्रा यांनी बैठकीत ही मागणी केली.

लोसभाध्यक्षांनी सभागृहाची कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. बैठकीस सभागृह नेत्यांव्यतिरिक्त शरद पवार, रामविलास पासवान, अजित सिंग, बासुदेव आचार्य, येरन नायडू व ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते.