मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 20 मे 2020 (14:16 IST)

बाळाला जन्म दिल्यानंतर 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

ससून रुग्णालयात एका 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून हे बाळ सुखरूप आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.

ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे अशाप्रकारे मातृछत्र हरवलने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हडपसर परिसरातील ही महिला महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती.