1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 15 जून 2021 (22:50 IST)

खबरदार ! सरकार ने सावध केले, कोरोनाचा नवा व्हेरियंट अधिक घातक आहे

Beware! The government warned that the new variant of the Corona is more dangerous
नवी दिल्ली ,देशात कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाची दुसरी लाट मंदावली आहे बऱ्याच राज्यात अनलॉक केले आहे. दरम्यान, सरकारने डेल्टा प्लस व्हेरियन्टच्या बाबत सावधगिरी बाळगायला सांगितले आहे.
मंगळवारी सरकारने नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरियन्ट मार्चपासून जवळपास आहे.
 
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की कोरोनाव्हायरसचा हा नवीन व्हेरियन्ट 2020 तुलनेत अधिकच हुशार झाला आहे.आता आपल्याला अधिकच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.आपल्याला सामाजिक अंतर पाळावे लागणार.मास्क सतत घालून ठेवावे लागणार. अन्यथा परिस्थिती पुन्हा वाईट होऊ शकते.
 
 आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की देशात सध्या जवळपास 9 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. 20 राज्यात 5000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. इतर राज्यांमध्येही सक्रिय प्रकरणे कमी होत आहेत.बरे होण्याची दर देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,17,525 रुग्ण बरे झाले आहे.