1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (18:20 IST)

लँसेट दावा: हवेत कोरोना विषाचे 10 ठोस पुरावे

आत्तापर्यंत असे म्हटले जात होते की कोरोना विषाणू केवळ ड्रॉपलेट्स पसरतो, परंतु आता नवीन अभ्यास धक्कादायक आणि भयानक आहे. या स्टडीमध्ये 10 ठोस कारण सांगितले गेले आहे ज्याने सिद्ध होतं की कोरोना व्हायरस सर्वात जास्त वार्‍यात पसरत आहे. अर्थात आता याहून बचावासाठी अधिक उपाय शोधावे लागतील.
 
जाणून घ्या ते 10 ठोस पुरावे ज्याने सिद्ध होत आहे की कोरनाचं विष पसरत आहे. नवीन रिर्पोटमध्ये सांगण्यात आलेले ते 10 कारण याप्रकारे आहे-
 
WHO देखील आत्तापर्यंत केवळ ड्रॉपलेटमुळे व्हायस पसरत असल्याचं सांगत होता. परंतू आता रिर्पोटप्रमाणे काहीतर चूक झाल्याचे कळून येत आहे.
 
1. इव्हेंट्स
एका कॉयर इव्हेंट्समध्ये एका इन्फेक्टेड व्यक्तीमुळे 53 लोक इन्फेक्ट झाले. यावर स्टडी करण्यात आली. हैराण करणारी बाब म्हणजे ते लोकं आपसात भेटले देखील नाही, तर निश्चितच वार्‍यामुळे व्हायरस त्यांच्यापर्यंत पोहचला असावा. स्टडीप्रमाणे मानवी वर्तन आणि संवाद, खोलीचा आकार, वेंटिलेशन आणि कॉयर कंसर्ट्स सोबत इतर परिस्थिती, क्रूज शिप्स, कत्तलखाने, केअर होम्स आणि सुधारगृहांमध्ये देखील व्हायरस पसरण्याचा एक पॅटर्न दिसून येत आहे. हे सिद्ध करतं की या प्रकाराच्या इव्हेंट्समध्ये एअरोसोल (हवेत व्हायरसचे लहान कण) मुळे ट्रांसमिशन झालं.
 
2. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत
न्यूजीलँडमध्ये केलेल्या एका स्टडीच्या आधारावर दोन लोक एका खोलीत नव्हते. दोघं एममेकांना भेटले देखील नाही. तरी इन्फेक्शन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत पोहचलं. हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा कम्युनिटी ट्रांसमिशन च्या गैरहजेरी मध्ये लॉन्ग-रेंज ट्रांसमिशन झालं असेल.
 
3. लक्षण नाही तर ट्रांसमिशन का?
जी लोकं खोकत किंवा ‍शिंकत नव्हती, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर इन्फेशन पसरवलं. दुनियभरात एक तृतीयांश ते 60 टक्के कोरोना व्हायरस या लोकांनी पसरवला. हे तेव्हा घडू शकतं जेव्हा हवेमुळे व्हायरस पसरतं असेल. रिर्पोटप्रमाणे जेव्हा कोणी आपसात बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडातून हजारोच्या संख्येत एअरोसोल पार्टिकल्स निघतात जेव्हाकि मोठे ड्रॉपलेट्स खूपच कमी प्रमाणात बाहेर पडतात. याने इन्फेक्शन वार्‍यात पसरण्याला मदत होते.
 
4. इनडोरमध्ये व्हायरस
व्हायरस इनडोरमध्ये अधिक आणि आउटडोरमध्ये कमी प्रमाणात पसरतं. जर इनडोरमध्ये पुरेशी वार्‍याची व्यवस्था असेल आणि वेंटिलेशन असेल तर इन्फेक्शन पसरण्याची भीती कमी होते. दोन्ही ऑब्जर्वेशन सांगतात की वार्‍यात व्हायरस ट्रांसमिट होत आहे.
 
5. रुग्णालयात संसर्ग का?
रुग्णालयात बरेच अभ्यास झाले. रुग्णालयांमधील डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचार्‍यांनी ड्रॉपप्लेट्सची काळजी घेतली. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (PPE) देखील घातले, तरी ते इन्फेक्शनपासून वाचू शकले नाही. पीपीई किट्ससोबतच इतर काळजी घेतल्यानंतरही डॉक्टरांना संसर्ग झाले. स्पष्ट रुपात त्यांना एअरोसोल विरुद्ध प्रोटेक्शन नव्हतं.
 
6. हवेच्या नमुन्यात व्हायरस
कोरोना प्रयोगशाळेच्या प्रयोगात संक्रमित झालेल्या लोकांना एका खोलीत ठेवले गेले होते. त्यांच्या तेथून निघून गेल्यानंतर तीन तासांपर्यंत वार्‍यात व्हायरसचे पुरावे मिळाले आहे. अगदी संक्रमित व्यक्तीच्या कारमधून घेतलेल्या हवेच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू देखील आढळला आहे.
 
7. रुग्णालयात एअर फिल्टर
कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या रुग्णालयांमध्ये एअर फिल्टर आणि बिल्डिंगच्या डक्टमध्ये देखील कोरोना व्हायरस सापडले आहेत. या जागी केवळ एअरोसोलच पोहचू शकतात.
 
8. प्राण्यांमध्ये संक्रमण
एका स्टडीत बघण्यात आले की प्राण्यांचे पिंजरे वेगवेगळे होते, एअर डक्ट सारखं होतं, तरी ते कोरोना संक्रमित झाले. हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा व्हायरस एअरोसोल रुपात ट्रांसमिट होतं असेल.
 
9. हवेत पसरण्याचा पुरावा नाही
रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत कोणतीही स्टडी झालेली नाही, ज्यात पुरावा सापडला असावा की कोरोना व्हायरस वार्‍याने पसरत नाही. संक्रमित लोकांसह एकाच खोलीत राहून देखील संसर्ग न झाल्याचे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणासाठी संक्रमित व्यक्तीत व्हायरस लोड कमी असणे.
 
10. ट्रांसमिशनचे इतर कोणतेही कारण नाही
रिपोर्टप्रमाणे इतर मार्गांनी ट्रांसमिशनला सपोर्ट करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. अर्थात मोठ्या ड्रॉपलेट्सद्वारे व्हायरस ट्रांसमिट होण्यासंबंधी कोणतेही खास पुरावे समोर आलेले नाही.