कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?
राज्यात शुक्रवारी (9 एप्रिल) 58,993 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 5,34,603 वर गेली आहे.
शुक्रवारच्या दिवसात मुंबईत 9,202, पुणे महापालिका क्षेत्रात 5,714 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 4,492 रुग्ण आढळले. तर नाशिक महापालिका क्षेत्रात 2,385 रुग्ण आढळले.
राज्यात शुक्रवारी (9 एप्रिल) 45,391 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्याचा रिकव्हरी रेट घसरण होत 81.96% वर आलेला आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुक्रवारी 301 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आजपर्यंत राज्यात 57,329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.