नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

corona virus 1
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव जवळच्या नंदनवन नगर पिंपळगांव नजिक येथील ३० वर्षाचा युवक आहे. तो रजा नगर येथील दुकानांत काम करीत होता. त्याला १२ मार्च ला
खोकला व ताप अशी लक्षणे असल्यामुळे तेथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. परंतु त्याला बरे वाटले नाही म्हणुन तो २५ मार्चला ग्रामीण रुग्णालय लासलगांव येथे उपचारासाठी गेला. त्यावेळी न्युमोनियाची सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथे संदर्भित केले. तो स्वत:च्या वाहनाने २७ मार्च
जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथील वैद्यकिय पथकाने विलगीकरण कक्षांत दाखल केले. व त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष आलेला आहे.
सदर रुग्णाची तब्येत स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यांत येत आहे. उर्वरित कोरोना विलगीकरण कक्षातील दाखल रुग्णांचे घश्याच्या स्त्रावाचे स्वॉब निगेटीव्ह आहेत. सध्या कोरोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन ती सुधारत आहे. 300 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे - आ. सुधीर मुनगंटीवार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी 300 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत. या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे. या परिस्थितीत 300 युनिट पर्यंत
विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...