समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन
गीरीचे मस्तकी गंगा ।तेथुनि चालिली बळे ।धबाबा लोटती धारा ।धबाबा तोय आदळे ॥ १॥गर्जतो मेघ तो सिंधु ।ध्वनि कल्लोळ उठीला ।कड्यासी आदळे धारा ।वात आवर्त होतसे ॥ २॥तुशार उठती रेणु ।दुसरे रज मातले ।वात मिश्रीत ते रेणु ।सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥दराच तुटला मोठा ।झाड खंडे परोपरी ।निबीड दाटली छाया ।त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥गर्जती स्वापदे पक्षी ।नाना स्वरे भयंकरे ।गडद होतसे रात्री ।ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥कर्दमु निवदेना तो ।मनासी साकडे पडे ।विशाळ लोटली धारा ।ती खाली रम्य विवरे ॥ ६॥कपाटे नेटक्या गुंफा ।तापसी राहती सदा ।नेमस्त बांधली नाना ।उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७॥विश्रांती वाटते तेथे ।जावया पुण्य पाहिजे ।कथा निरुपणे चर्चा ।सार्थके काळ जातसे ॥ ८॥