शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By वार्ता|

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर चेन्नईत हाय अलर्ट

राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशात 'हाय अलर्ट' लागू करण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारकडून देशातील संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्याचा आदेश मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या अतिरेकी हल्ल्यानंतर नवी दिल्लीत नेहमी सावधान राहण्‍याचा आदेश केंद्राकडून येत असतो. त्याच्या आधारे कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटनेपासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेने (पोलिसांनी) कंबर कसली आहे.

हाय अलर्टच्या सूचनेनंतर राज्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.