पंतप्रधानांनी केली जखमींची विचारपूस
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींची येथील राममनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. जखमींवर उपचारासह इतर सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.यावेळी त्यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्याचे मात्र टाळले. रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याची बातमी प्रसिध्द होताच रुग्णालयांबाहेर रक्तदान करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.