शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By वेबदुनिया|

मुंबईतून पाठवण्यात आला इ-मेल

दिल्ली येथे झालेल्या साखळी स्फोटांनंतर पोलिसांना पाठवण्यात आलेला 'तो' मेल मुंबईतील कामरान पावर, एरिक हाऊस, 201-202, 16 वा रस्ता चेंबुर या भागातून पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांना असून मुंबई पोलिसांना याची माहिती देण्‍यात आली आहे. अहमदाबादेत झालेल्या स्फोटांचा मेलही मुंबईतूनच आला होता.

दिल्लीत स्फोट झाल्यानंतर या वृत्तवाहिनीला मेल पाठवण्यात आला होता, यात दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर पोलिसांना हा मेल आला होता. या मेल सर्व्हरचा तपास पोलिसांनी केला असता त्याची पाळेमुळे मुंबईत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.