शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्‍ली, , शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (22:28 IST)

दिल्‍ली तो झांकी है मुंबई अभी बाकी है...

आम्‍ही अहमदाबाद, हैदराबादच नव्‍हे तर दिल्‍लीतही बॉम्‍बस्‍फोट करण्‍यात यशस्‍वी ठरलो आहोत.. केवळ सहाच नव्‍हे दिल्‍लीत आणखी स्‍फोट करण्‍याची ताकद आमच्‍यात आहे. दिल्‍ली ही तर केवळ झांकी आहे मुंबई अभी बाकी है.. असे सांगत दहशतवाद्यांनी मुंबईत बॉम्‍बस्‍फोटाचा इशारा दिला आहे.

बॉम्‍ब स्‍फोटांच्‍या काही वेळेनंतरच आलेला हा ई-मेलही मुंबईहूनच आला आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे झालेल्‍या स्‍फोटानंतरही मुंबईतूनच मेल आला होता. केनेथ हेवूड या अमेरिकन नागरिकाचा ईमेल हाईक करून त्‍यावरून दहशतवाद्यांनी हा मेल पाठविला आहे. आता पुन्‍हा या स्‍फोटानंतर तसाच मेल आला आहे. त्‍यामुळे देशभर हायअलर्ट जारी करण्‍यात आला आहे.