शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By वेबदुनिया|

राजधानीतील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा

राजधानी दिल्लीमध्ये 26 मिनिटात पाच ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 18 नागरिक मृत्युमुखी तर शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना रक्ताची गरज भासत आहे. त्याप्रमाणात हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने उपचार करण्यात डॉक्टरांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

रक्त देण्यासाठी शहरातील नागरिकही पुढे आले आहेत. मात्र, जखमींची वाढती संख्या लक्षात घेता रक्ताचा तुटवडा जाणावत आहे. दिल्ली शहरातील जे नागरिक जखमींना रक्त देण्यास इच्छूक आहेत. त्यांनी तत्काळ रेडक्रॉसला दूरध्वनी क्र.011-23715442, 23715443, 23715445 वर संपर्क साधण्याचे दिल्ली प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.