साहित्य : एक कांदा, दोन टेबलस्पून बटर, दोन वाट्या चिरलेला पालक, अर्ध लिंबू, दोन चमचे क्रीम, शिजवलेलं वरण तीन चमचे, एक लहान बटाटा किसून, तीन कप पाणी, दीड चमचा मीठ, एक चमचा साखर, जिरं व मिरे पूड प्रत्येक अर्धा चमचा.
कृती : कांदा बारीक चिरावा. बटाट्याची सालं काढून चीजच्या किसणीवर किसावा. हा कांदा व बटाटा लोण्यावर परतून घ्यावे. तीन-चार मिनिटं झाकून वाफ आणावी. मग उतरवून गार झाल्यावर हे मिश्रण, वरण, पाणी, मीठ साखर, लिंबूरस हे सर्व एकत्र करून पुन्हा गाळून उकळावं व त्यात जिरं-मिरे पूड घालावी. उकळी आल्यावर उतरवून त्यात क्रीम मिसळावं.