शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (12:06 IST)

नवरात्री उत्थापन आणि विसर्जन

नवरात्रीत नित्याप्रमाणे षोडशोपचार पूजा, महानैवेद्य समर्पण, मालाबंधन इत्यादी विधी समाप्त झाल्यावर नवरात्रौत्थापन-घटोत्थापन करावयाचे असते. त्यासंबंधी माहिती जाणून घ्या-
 
आचमन आणि प्राणायाम इत्यादी झाल्यावर संकल्प करावा- 
संकल्प- 
तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्चकरणंचैव सर्व विष्णुमयं जगत्॥
अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गादि स्थापितदेवतानां उत्थापनं करिष्ये ।
 
असे म्हणून ताम्हनात पळीने पाणी सोडावे
 
"तथाच पंचोपचार पूजनमहं करिष्ये "
असे म्हणून पंचोपचार पूजा करावी.
 
प्रार्थना -
दुर्गा शिवा शांतिकरीं ब्रम्हाणी ब्रह्मणप्रियां । सर्वलोकप्रणेत्रीं च तां नमामि सदाशिवम् ॥१॥
विधिहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदचिंतं । पूर्ण भवतु तत्सर्व त्वत्प्रसादात् महेश्वरि ॥२॥
अशी प्रार्थना करावी. 
 
हात जोडावे आणि म्हणावे -
" माता क्षमस्व । ॐ दुर्गायै नम: ॥"
 
असे म्हणून कलशावरील ईशान्येच्या बाजूचे एक फूल काढावे आणि विसर्जन मंत्र म्हणावा.
विसर्जन मंत्र -
उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य च । कुरुष्व मम कल्याणमष्टाभि: शक्तिभि: सह ॥
गच्छ गच्छ परं स्थानं स्व्स्थानं देवि चंडिके । व्रत स्रोतोजतोजलौर्वृध्यै तिष्ठ गेहेच भूतये ॥
दुर्गे देवि जगन्माता: स्वस्थानं गच्छ पूजित: । संवत्सरे व्यताते तु पुनरागमनाय बै ॥
पूजामिमां मया देवि यथाशक्ति निवेदिताम्‌ । रक्षणार्थ समादाय व्रज स्वानमनुत्तमम् ॥
 
याप्रमाणे प्रार्थना करुन देवीवर अक्षता वाहाव्या व घट हलवावा. घटातील थोडे पाणी काढून घ्यावे व ते कुटुंवातील सर्व मंडळींवर मार्जन करावे. त्याचप्रमाणे माळा वगैरे सर्व निर्माल्य वाहत्या पाण्यात नेऊन सोडावे. नऊ दिवसात धान्यांना आलेले अंकुर काढुन ते ब्राम्हण, सुवासिनी, कुमारिका व इष्टमित्र यांना द्यावे. अन्नसंतर्पण, दक्षिणा वगैरे यथाशक्ती द्यावे आणि हा उत्सव पूर्ण करावा.
 
उदयोस्तु । जय जगदंब ।
देवीची आरती म्हणावी आणि जोगवा घालावा.
देवीची प्रार्थना म्हणावी.