औरंगाबादमध्ये वेबदुनियाला तुडूंब प्रतिसाद
वेबदुनियाची प्रचार मोहिम औरंगाबाद शहरात धडाक्यात सुरू असून गुरूवारी (ता.३१) विविध शाळा व महाविद्यालयांत प्रचार करण्यात आला. सकाळी संत मीरा शाळा तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये वेबदुनियाची माहिती देण्यात आली. प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना वेबदुनियाची अनोखी दुनिया दाखविण्यात आली. मातृभाषेतील या दुनियेला पाहून विद्यार्थीही हरखून गेले होते. वेबदुनियात असलेले विविध विभाग यांची माहिती देण्याबरोबरच विविध सेवांची ओळखही विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. मराठीत ई-मेल करण्याची सुविधा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही आवडली. अनेक विद्यार्थ्यांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले. त्यांचे शंकानिरसन करण्यात आले. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांना वेबदुनियाच्या कॅप्स देण्यात आल्या. दुपार सत्रात छत्रपती महाविद्यालयात वेबदुनियाची प्रचार मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला तुडूंब प्रतिसाद मिळाला. प्रोजेक्टरद्वारे साकारलेली वेबदुनिया पहायला हॉलही कमी पडला. अखेर विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहापोटी आणखी एक सत्र घेण्यात आले. या दो्न्ही सत्रात विद्यार्थ्यांनी अतिशय कुतूहलपूर्वक वेबदुनियाची माहिती घेतली. प्रश्न विचारून त्याची उत्तरेही मिळवली. शाळा महाविद्यालयांनंतर संध्याकाळी उस्मानपुरा, औरंगपुरा व सिडको भागात प्रचार मोहिम राबविण्यात आली. येथे लॅपटॉपद्वारे नागरिक तसेच उत्सुकतेने येणार्या तरूणाईला माहिती देण्यात आली.