शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2015 (17:06 IST)

बटाटा वेफर्स

साहित्य: अर्धा किलो बटाटे, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर तुरटी, चार वाट्या पाणी.
कृती: बटाटे स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घ्यावी. पुन्हा धुवावे. वेफर्सच्या किसणीवर त्याच्या काचर्‍या करून पाण्यात टाका. दुरर्‍या बाजूला तुरटीची पूड व मीठ घालून पाणी उकळून घ्या. अता त्या पाण्यात काचर्‍या घाला.

मध्येमध्ये त्याला हलवत राहा. काचर्‍या वर येऊ लागल्या की त्यांना चाळणीत काढून घ्या. पाणी निथळून गेले की काचर्‍यांना प्लॅस्टिक वर घालून कडकडीत उन्हात वाळवून घ्याव्या. वाळ्यावर कधीही तळून खाऊ शकता. असे वेफर्स वर्षभर टिकतात.