रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (09:05 IST)

घाटावर ११ भावीकांना विजेचा झटका; पनवेलमधील मोठी दुर्घटना

electricity
कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही घटना घडली.
जखमींना पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तर शहरातील लाईफलाईन पटवर्धन व पटेल अशा विविध रुग्णालयात स्वयंसेवक घेऊन गेले. यावेळी पालिकेचे कर्मचारी असल्याने पालिका प्रशासनाने धावाधाव करुन भावीकांना वेळीच उपचार दिले. विजेच्या झटक्याचे नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन दल व पोलीसांचे पथक काम करत होते. उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी दाखल सात रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती दिली.