गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (16:47 IST)

जेष्ठां -कनिष्ठा, आल्या घरी की आंनद न अन्य

माहेरवाशीण येतील घरा, करावयास धन्य धन्य,
जेष्ठां -कनिष्ठा, आल्या घरी की आंनद न अन्य,
लगबग होतें, होते सर्वत्र आवरसावर,
हौशेने बाल, वृद्ध सजवती घरी मखर,
भरल्या जातात राशी, अन झुले फुलोरा वर,
हे महालक्ष्मी आई, ये लेकरासवे घरीं तू सत्वर,
ओटी भरून करीन स्वागत, घालीन हार गजरे,
नेसवून साडी चोळी, रांधींन जेवण सुग्रास खरे,
काय करू नी काय नको, असं सऱ्यास होई,
जेवणखाण कर, तू लेकरा सवे, अन तृप्त हो आई,
अधिक उणें जर राहीले असेल तर माफ कर मजला,
देईन शिदोरी संग मी तुझ्या, आशिष दे सकळां,
यावेस तू दरवषी, हीच तुज आहे प्रार्थना,
पुढील वर्षी वाट बघीन, समजाविन माझिया मना!!
....अश्विनी थत्ते