कहाणी ऐकल्याशिवाय हरतालिका व्रत अपूर्ण, जाणून घ्या नियम
भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात. हरितालिका व्रत केल्याने सौभाग्य येतं आणि कुमारिकांना मनोइच्छित वर प्राप्ती होते म्हणून मनोभावे हे व्रत केलं जातं. कुमारिका चांगला पती मिळावा तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, यासाठी हे व्रत करतात. परंतू याचे काही कडक नियम देखील आहेत तर हे व्रत करताना हे नियम जाणून घेणे देखील आवश्यक आहे.
मान्यता आहे की एकदा हे व्रत करण्यास सुरुवात केल्यास आजीवन हे व्रत करावे.
या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो. अन्न-पाणी ग्रहण केले जात नाही.