शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (11:31 IST)

Jyeshtha Gauri जगतजननी तूच असशी महालक्ष्मी माता!!

आवाहन मी करते, यावं प्रेमभरे,
तुमच्याचं कृपेने  नांदती सर्वच सौख्यभरे,
राहावं घरी, घ्यावे माहेरपण तूम्ही,
बसावं मखरांत, तृप्त व्हावं तुम्ही,
पुरवून घ्यावे लाड कोड येता माहेरी,
ल्यावी साडी चोळी नवीही भरजरी,
दागदागिने अंगावर घाला, माळा वेणी,
मुलाबाळां बरोबर तुमची ही आनंदपर्वणी.
तूच महामाया माय आहे ग आमुची,
सेवा तुमची घडो सदा गोष्ट आनंदाची,
 असेल तुझाच वास घरोघरी आता ,
जगतजननी तूच असशी महालक्ष्मी माता!!
..अश्विनी थत्ते