मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 23 मे 2014 (11:27 IST)

उद्धव ठाकरे आज फेडणार एकवीराचा नवस

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा माता आणि कोकणातील भराडी देवीकडे नवस फेडणार आहे.  शिवसेनेच्या नवनिर्वा‍चित 18 खासदारासह उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) आपला एकविरा मातेचा नवस फेडण्यासाठी आहे. तसेच येत्या रविवारी कोकणातील भराडी मातेच्या दर्शनाला ठाकरे रवाना होणार आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेला विजय मिळाल्यास खासदाराला घेऊन दर्शनाला येईन, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली सभेत घातले होते. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या नीलेश राणे यांचा दणदणीत पराभव करून कोकणात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार मोठय़ा प्रमाणात निवडून दे, असे साकडे कार्ला येथील एकवीरा मातेला घातले होते. आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनाला जाणार असून देवीची खणा-नारळाने ओटी भरून आपला नवस पूर्ण करणार आहेत.