बुधवार, 30 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (09:24 IST)

राज ठाकरे यांची राजकीय ताकद वाढणार, विधानसभेत जिंकणार दोन आकडी जागा

राज ठाकरे यांचा पक्ष मनसे हा विधानसभेत यश मिळवणार असून, राज ठाकरे यांच्या करिष्म्याने दोन आकडी जागा मनसे जिंकणार आहेत, तर देशाच्या पंतप्रधान पदी मात्र पुन्हा नरेद्र मोदीच विराजमान होणार असे भाकीत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी केले आहे. नाशिकमध्ये आयोजित दोनदिवसीय राज्य ज्योतिष्य अधिवेशनाचा समारोप झाला. यावेळी आलेल्या ज्योतिष्यांनी देश व महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कुंडली मांडत सत्तेची गणिते मांडली आहेत.
 
माटकरयांच्या भाकिता नुसार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होणार आहे. राज ठाकरे यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येतोय, त्यामुळे पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत दोन आकडी जागा जिंकता येतील असे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर म्हणाले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांनी कोणताही उमेदवार न देता मात्र जोरदार प्रचार केला आहे. त्यांनी निवडणुकीत  सक्रिय सहभाग नोंदवला होता. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राभरात सभा घेतल्या, सभांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत नक्की होईल, त्यामुळे महाराष्ट्रात युतीला मोठा फटका बसून शिवसेनेच्या जागा हातातून जाणार आहेत, राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल. या निवडणुकीत मनसेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल आणि मनसेचे दोन अंकी आमदार निवडून येतील  असे भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.