गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (17:15 IST)

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे टाळा, जाणून घ्या व्रताचे महत्त्व

हिंदू धर्मात दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व असते. असे म्हटले जाते की प्रत्येक अमावास्येला वेगळे महत्त्व असते. या दिवशी पूजेचेही विशेष महत्त्व मानले जाते. एवढेच नाही तर या दिवशी व्रत ठेवून पितरांना तीळ अर्पण करावे असे केल्याने पितर समाधानी होतात. यामुळेच या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

सोमवारी येणारी अमावस्या याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात. जाणून घेऊया कोणता आहे या दिवशी कोणते कामे करणे टाळावे.
 
सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे टाळा
कधीही कोणाचाही अनादर करू नये, पण ज्योतिषशास्त्रात सोमवती अमावस्येच्या दिवशी
चुकुनही अपमान करणे अत्यंत वाईट मानले जाते.
या दिवशी कोणाचेही मन दुखवणे टाळावे. अशा वेळी लहान किंवा मोठ्यांशी बोलताना कडवट शब्द वापरू नयेत.
सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्मशानभूमीत जाऊ नये.
या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना झाडाला स्पर्श करू नये असे सांगितले जाते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत
झोपण्याऐवजी सकाळी लवकर उठले पाहिजे.
या दिवशी मांस आणि मदिराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी नखे कापू नयेत.
 
सोमवती अमावस्या : या दिवशी काय करावे
सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान व पूजा करावी. या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी गरजूंना दान दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 
 
अशा स्थितीत सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करून पूजा करावी. असे शक्य नसेल तरी किमान मांसाहार करू नये. हे नियम पाळल्यास तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कार्यक्षम होईलच तसेच तुम्हाला पैश्याचीही अडचण होणार नाही.