सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (08:45 IST)

नारद मुनी हवेत कसे फिरत असत, जाणून घ्या 10 रहस्ये

हिन्‍दू शास्‍त्रांप्रमाणे नारद मुनी हे ब्रह्मांचे मानस पुत्र आहे.आपल्याला प्रत्येक पुराणात त्यांच्या कथा सापडतील. थोडक्यात जाणून घेऊया त्याच्या शक्तीचे रहस्य काय होते आणि त्याची कथा काय आहे.
 
1. हिंदू मान्यतेनुसार विश्वाचा निर्माता ब्रह्माजींच्या मांडीत नारद मुनिचा जन्म झाला. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार त्यांचा जन्म ब्रह्मांच्या कंठातून झाला होता.
 
2. देवर्षी नारदांना महर्षी व्यास, महर्षी वाल्मीकि व महाज्ञानी शुकदेवांचा गुरु मानलं जातं. असे म्हणतात की नारदजींनी दक्ष प्रजापतीच्या 10 हजार पुत्रांना जगापासून निवृत्त होण्याची शिक्षा दिली. देवतांचे ऋषी असल्यामुळे नारद मुनींना देवर्षी महटलं गेलं. प्रसिद्ध मैत्रायणी संहिता यात नारदांना आचार्यच्या रुपात सन्मानित केलं गेलं आहे. काही ठिकाणी नारदांचे वर्णन बृहस्पतीच्या शिष्य रुपात देखील बघायला मिळतं. अथर्ववेदात देखील अनेकदा नारद नावाच्या ऋषींचे वर्णन आहे. भगवान सत्यनारायणाच्या कथेत देखील त्यांचे वर्णन आहे.
 
नारद मुनींनी भृगु कन्या लक्ष्मींचे विवाह विष्णूंशी करवले. इन्द्रांची समजूत घालून उर्वशी व पुरुरवा यांचे परिणय सूत्र करवले. महादेवांद्वारे जलंधराचा विनाश करवला. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजवला. वाल्मीकि यांना रामायण लिहिण्यासाठी प्रेरित केले. व्यासजींना भागवत रचनेसाठी प्रेरित केले. इन्द्र, चन्द्र, विष्णु, शंकर, युधिष्ठिर, राम, कृष्ण इतरांना उपदेश देऊन कर्तव्याकडे वळवले.
 
3. असे म्हणतात की त्यांनी ब्रह्माकडून संगीत शिकले. भगवान विष्णूने नारदांना मायाचे विविध प्रकार समजावून सांगितले. नारद अनेक कला व विषयांत पारंगत आहे. बरीच शास्त्रे त्याला विष्णूंचा अवतार मानतात आणि म्हणूनच नारद त्रिकालदर्शी आहेत. हे वेदांतप्रिय, योगनिष्ठ, संगीत शास्त्री, औषधी ज्ञाता, शास्त्रांचे आचार्य व भक्ति रसाचे प्रमुख मानले जातात. देवर्षी नारदांना श्रुति-स्मृति, इतिहास, पुराण, व्याकरण, वेदांग, संगीत, खगोल-भूगोल, ज्योतिष व योग या सारखे अनेक शास्‍त्रांचे प्रकांड विद्वान मानलं जातं.
 
4. नारद मुनी देवांना मार्ग प्रशस्त करणारे देवर्षी आहे व 'पांचरात्र' द्वारे रचित प्रमुख ग्रंथ आहे. तसंतर 25 हजार श्लोकांचे प्रसिद्ध नारद पुराण यांच्याद्वारे रचित आहे. या व्यतिरिक्त 'नारद संहिता' संगीताचे एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. 'नारद के भक्ति सूत्र' यात ते भगवत भक्तीचं महात्म्याचे वर्णन करतात. या व्यतिरिक्त बृहन्नारदीय उपपुराण-संहिता- (स्मृतिग्रंथ), नारद-परिव्राज कोपनिषद व नारदीय-शिक्षेसह अनेक स्तोत्र देखील उपलब्ध असतात.
 
5. नारद हे विष्णूंचे भक्त मानले जातात आणि त्यांना अमर होण्याचा आशीर्वाद आहे. भगवान विष्णूच्या कृपेने ते सर्व युगात आणि तिन्ही जगात कुठेही दिसू शकतात. असेही मानले जाते की लघिमा शक्तीच्या जोरावर ते आकाशात प्रवास करीत असत. लघिमा अर्थात लघु व लघु अर्थात हलक्या कापसाप्रमाणे पदार्थाच्या आकलनाने आकाश
 
मध्ये प्रवास करणे. ही थ्योरी टाइम ट्रेवलची देखील आहे. प्राचीनकाळात सनतकुमार, नारद, अश्‍विन कुमार इतर अनेक हिन्दू देवता टाइम ट्रेवल करत होते. वेद आणि पुराणात अशा बर्‍याच घटनांचा उल्लेख आहे.
 
6. देवर्षि नारद यांना जगातील पहिले पत्रकार होण्याचा मान आहे. कारण देवर्षि नारदांनी या जगापासून त्या जगाकडे फिरणार्‍या संवादांची देवाणघेवाण करून पत्रकारितेची सुरूवात केली. अशा प्रकारे देवर्षि नारद हे पत्रकारितेतील प्रथम पुरुष / अग्रणी नर / पूर्वज पुरुष आहे. ते इकडे तिकडे फिरत राहतात अर्थात भ्रमण करतच असतात.
 
दुसर्‍या आख्यायिकेनुसार, दक्षपुत्रांचा योग असल्याचं उपदेश देत संसारापासून विमुख केल्यावर जेव्हा दक्ष क्रोधित झाले व त्यांनी नारदांचा विनाश केला तेव्हा ब्रह्मांच्या आग्रहावर दक्ष यांनी म्हटले की मी आपल्याला एक कन्या देत आहोत, तिचं कश्यपसह विवाह झाल्यावर नारद पुनः जन्म घेतील. राजा प्रजापती दक्षाने नारदाला शाप दिला होता की दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ ते कुठेही राहू शकत नाही, असे पुराणात सांगितले गेले आहे. याच कारणामुळे नारद सतत भ्रमण करत असतात.
 
7. असे म्हटले जाते की भगवान विष्णूने नारदाला मायाचे विविध प्रकार समजावून सांगितले होते. एकदा प्रवासादरम्यान नारदांना तलावात आंघोळ करुन स्त्रीत्व प्राप्त झाले होते. स्त्री रूपात नारद 12 वर्षांपर्यंत राजा तालजंघ यांच्या पत्नी रुपात होते. त्यानंतर, भगवान विष्णूच्या कृपेने, त्याला पुन्हा तलावामध्ये स्नान करण्याची संधी मिळाली आणि ते पुन्हा नारदच्या रूपात परतले.
 
आपल्या वीणाच्या मधुर आवाजाने नारद नेहमी विष्णूची स्तुती करतात. तो नेहमीच त्यांच्या मुखातून नारायण-नारायणाचा जप करत असतात. नारद नेहमी विष्णूंच्या भक्तांची मदत करतात. असे मानले जाते की नारदांनी भक्ती प्रह्लाद, भक्त अंबरीश आणि ध्रुव या भक्तांना भक्ती मार्गावर नेले.
 
8. असे म्हणतात की नारदांनी दक्ष प्रजापतीच्या 10 हजार पुत्रांना संसारपासून निवृत्तीची शिक्षा दिली जेव्हाकि ब्रह्मा त्यांना सृष्टिमार्गावर पाठवू इच्छित होते. त्यावर ब्रह्मांनी पुन्हा शाप ‍दिला होता. या शापामुळे नारद गंधमादन पर्वतावर गंधर्व योनित उत्पन्न झाले. या योनित नारादांचे नाव उपबर्हण असे होते. असेही मानले जाते की पूर्वकल्पात नारदजी उपबर्हण नावाचे एक गंधर्व होते. त्यांच्या 60 बायकां होत्या व रुपवना असल्यामुळे ते नेहमी सुंदर स्त्रियांच्या जवळपास असत. म्हणून ब्रह्मांनी त्यांना शूद्र योनित जन्म होण्याचा शाप दिला होता.
 
या शापामुळे नारदांचा जन्म शूद्र वर्गाच्या एका दासीकडे झाला. जन्म घेतल्यावर वडीलांचे निधन झाले. एकेदिवशी सापाच्या दंशामुळे त्यांच्या आईचे निधन झाले. आता नारद संसारात एकटे राहून गेले तेव्हा ते पाच वर्षाचे होते. एकदा चतुर्मास दरम्यान संतजन त्यांच्या गावी थांबले तेव्हा नारदांनी त्यांची खूप सेवा केली. संतांच्या कृपेने त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. वेळे आल्यावर नारदांचा पांचभौतिक शरीर निर्वाण झाला व कल्पाच्या शेवटी ब्रह्मांच्या मानस पुत्राच्या रुपता ते अवतरित झाले.
 
9. तुलसीदासजींच्या श्रीरामचरित मानसच्या बालकांडनुसार नारदजींना कामावर विजय मिळवण्याचा अभिमान झाला होता. प्रभूंनी एकदा आपल्या मायेने एका नगराचे निर्माण केले, ज्यात एका सुंदर राजकन्येचं स्वयंवर होतं. नारदांनी प्रभूंकडे जाऊन त्याचं सुंदर मुख मागितले ज्यानेकरुन राजकुमारीने त्यांना पसंत करावं. परंतु आपल्या भक्तांच्या चांगल्यासाठी प्रभुंनी त्यांना माकडाचं मुख प्रदान केलं. स्वयंवर मध्ये राजकन्या (स्वयं लक्ष्मी) यांनी प्रभूंना वर म्हणून स्वीकाराले. जेव्हा नारदांनी आपलं मुख पाण्यात बघितलं तर क्रोधित झाले. नारदांनी प्रभूं विष्णुंना शाप दिला की त्यांना आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल व तेव्हा वानरचं त्यांची मदत करतील.
 
10. पुराणानुसार ब्रह्माजींनी नारदांना सृष्टीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आणि लग्न करण्यास सांगितले पण त्यांनी आपला पिता ब्रह्मा यांचे आज्ञांचे पालन केले नसून  विष्णूची भक्ती करत राहिले. तेव्हा रागाच्या भरात ब्रह्माजींनी देवर्षि नारदाला आजीवन अविवाहित राहण्याचा शाप दिला.
 
नारद जयंतीच्या दिवशी प्रभू विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यावरच नारदांची पूजा केली जाते. या दिवशी गीता व दुर्गासप्‍तशती पाठ करावा. या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात श्रीकृष्णाला बासरी अर्पण करुन अन्न व वस्त्र दान केले पाहिजे.