नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या

lord shiva
Last Modified गुरूवार, 12 मे 2022 (07:53 IST)
ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता ।
पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥
ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा ।
मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥
जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ।
मनोजदमनी मनमोहना । कर्ममोचका विश्र्वभरा ॥ ३ ॥
जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ।
नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ ४ ॥
संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण ।
न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥ ५ ॥
न कळतां प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ ।
औषध नेणतां भक्षित । परी रोग हरे तत्काळ ॥ ६ ॥
जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा ।
चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥ ७ ॥
हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना ।
ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजन महेश्र्वर ॥ ८ ॥
हे वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्र्वरा ।
अर्धनारीनटेश्र्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ९ ॥
धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं ।
तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥ १० ॥
न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्वकर्ता कारण ।
कोठें प्रगटशी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥ ११ ॥
जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ।
सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥ १२ ॥
' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥ १३ ॥
बहुत शास्रवक्ते नर । प्रायश्र्चित्तांचा करितां विचार ।
परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्र्चित्तां आगळें ॥ १४ ॥
नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।
त्यासी सर्व सिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १५ ॥
जय जयाची पचंवदना । महापापद्रुमनिकृंतना ।
मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥ १६ ॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा ।
पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ १७ ॥
नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवाहना अंधकमर्दना ।
दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥ १८ ॥
जय जय किशोर चंद्रशेखरा । उर्वी धरेंद्रनंदिनीवरा ।
त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥ १९ ॥
कोटि भानुतेजा अपरिमिता । विश्र्वव्यापका विश्र्वनाथा ।
समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्तत्रयीमूर्ते ॥ २० ॥
परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा ।
पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ २१ ॥
जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ति । तू वंद्य भोळा चक्रवर्ति ।
शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीति कथिलीस ॥ २२ ॥
जय जय भस्मोद्धूलितांगा । योगध्येया भक्तभवभंगा ।
सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपाशीं ॥ २३ ॥
जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम ।
धिक् गृह पर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥ २४ ॥
जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार ।
ज्यासी शिव शिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥ २५ ॥
जयाची शिवनामीं भक्ति । तयाचीं पापें सर्व जळती ।
आणि चुके पुनरावृत्ति । तो केवळ शिवरुप ॥ २६ ॥
जैसें प्राणियाचें चित्त । विषयीं गुंते अहोरात्र ।
तैसें शिवनामीं लागत । तरी मग बंधन कैचें ॥ २७ ॥
कामगजविदारकपंचानना । क्रोधजलप्रभंजना ।
लोभांधकार चंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥ २८ ॥
मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना ।
लोभ महासागरशोषणा । अगस्त्यमहामुवर्या ॥ २९ ॥
आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा ।
रुडंमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३० ॥
धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥ ३१ ॥
सूत सांगे शौनकांप्रति । जे भस्मरुद्राक्ष धारण करिती ।
त्यांच्या पुण्यासि नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥ ३२ ॥
जे करिती रुद्राक्ष धारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण ।
केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥ ३३ ॥
ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण ।
स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥ ३४ ॥
शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र ।
लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥ ३५ ॥
जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशूसमान ।
मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥ ३६ ॥
शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें ।
ऐसें माहात्म शंकराचें । निगमागम वर्णिती ॥ ३७ ॥
जो जगदात्मा सदाशिव । ज्यासि वंदितीं कमलोद्भव ।
गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥ ३८ ॥
जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ।
शुद्ध चैतन्य जगदादिकद । विश्र्वंभर दयाब्धी ॥ ३९ ॥ जो पंचमुख दशनयन । भार्गववरद भक्तजीवन ।
अघोर भस्मसुरमर्दन । भेदातीत भूतपति ॥ ४० ॥
तो तूं स्वजन भद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां ।
ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडी ॥ ४१ ॥
म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन ।
तरी या संकटांतून काढुनि पूर्ण संरक्षी ॥ ४२ ॥
॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Vinayaka Chaturthi 2022: विनायक चतुर्थीला बनत आहेत दोन शुभ ...

Vinayaka Chaturthi 2022: विनायक चतुर्थीला बनत आहेत दोन शुभ योग, जाणून घ्या पूजेची वेळ
Vinayak Chaturthi 2022 Shubh Muhurat: प्रत्येक महिन्याच्या दोन्ही बाजूंची चतुर्थी तिथी ...

भगवान जगन्नाथ त्रैलोक्यमोहिनी ध्वजासह महाकाय नंदीघोषावर ...

भगवान जगन्नाथ त्रैलोक्यमोहिनी ध्वजासह महाकाय नंदीघोषावर स्वार होणार, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये
पुरीची जगन्नाथ रथयात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. ही रथयात्रा 9 दिवसांची आहे. पुरी धामचे ...

Raksha Bandhan 2022 रक्षा बंधन कधी आहे? जाणून घ्या ...

Raksha Bandhan 2022 रक्षा बंधन कधी आहे? जाणून घ्या रक्षाबंधनचा मुहूर्त
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी म्हणजेच ...

Ashadh आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा

Ashadh आषाढ महिन्यात हे शुभ कार्य करा
स्कंद पुराणानुसार आषाढ महिन्यात एकभुक्त व्रत करावे. म्हणजेच अन्न फक्त एकाच वेळी खावे. असे ...

Guru Purnima 2022 यंदा गुरुपौर्णिमा महत्त्वाची का, जाणून ...

Guru Purnima 2022 यंदा गुरुपौर्णिमा महत्त्वाची का, जाणून घ्या कारण आणि महत्त्व
Guru Purnima 2022 Date: गुरुंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी गुरुपौर्णिमा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...