शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

राम आणि कृष्णाचा जन्म केव्हा झाला होता ?

नेहमी असे म्हटले जाते की रामतर लाखोवर्ष आधी जन्माला आले होते, पण शोधार्थी आणि प्रमाण म्हणतात की त्यांचा जन्म ईसा पूर्व 5114 वर्ष पूर्व झाला होता. याचा अर्थ असा की ते 5114+2016=7130 वर्ष पूर्व जन्माला आले होते. हा शोध वाल्मीकी रामायणात उल्लेखित ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि संपूर्ण भारतवर्षात सापडलेल्या पुरातात्विक अवशेषांच्या आधारावर झाला.  
 
लव आणि कुशच्या 50व्या पिढीत शल्य झाले, ज्यांनी महाभारतात कौरवांकडून युद्ध केले होते. या आधारावर हा वेळ काढण्यात आला आहे. श्रीरामाची ऐतिहासिकतेवर हा शोध वैज्ञानिक शोध संस्थान आय सर्वने केला. या शोधाचे नेतृत्व सरोज बाला, अशोक भटनागर आणि   कुलभूषण मिश्र यांनी केले होते. नवीन शोधानुसार 10 जानेवारी 5114 ईसा पूर्व प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता.  
श्रीकृष्णाचा जन्म : श्रीकृष्णाने विष्णूचा 8वा अवतार म्हणून जन्म घेतला होता. 8वे मनू वैवस्वतच्या मन्वंतरच्या 28व्या द्वापरात भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या रात्री जेव्हा 7 मुहूर्त निघून गेले आणि 8वा उपस्थित झाला तेव्हाच अर्ध्या रात्रीच्या वेळेस शुभ लग्नात देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाने जन्म घेतला. त्या लग्नावर फक्त शुभ ग्रहांची दृष्टी होती. रोहिणी नक्षत्र तथा अष्टमी तिथीच्या संयोगाने जयंती नावाचा योग किमान 3112 ईसा पूर्व (अर्थात आज जानेवारी 2016 ते 5128 वर्ष पूर्व) श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. ज्योतिषिप्रमाणे रात्री 12 वाजता त्या वेळेस शून्य काल होता.  
 
आर्यभट्टानुसार महाभारत युद्ध 3137 ईपू झाला होता. या युद्धाच्या 35 वर्ष पश्चात भगवान कृष्णाने देहत्याग केला होता तेव्हापासून  कलियुगाचा प्रारंभ झाला होता असे मानण्यात येत आहे. त्यांचा मृत्यू एका पारधीचा तीर लागल्यामुळे झाला होता. तेव्हा त्याचे वय 119 वर्ष एवढे होते.  
 
शोधकर्तांनी खगोलीय घटना, पुरातात्विक तथ्यांच्या आधारावर कृष्ण जन्म आणि महाभारत युद्धाच्या वेळेचे सटीक वर्णन केले आहे. ब्रिटनमध्ये कार्यरत न्युक्लियर मेडिसिनचे फिजिशियन डॉ. मनीष पंडित यांनी महाभारतात वर्णित 150 खगोलीय घटनांच्या संदर्भात म्हटले आहे की महाभारताचे युद्ध 22 नोव्हेंबर 3067 ईसा पूर्व झाले होते. त्या वेळेस कृष्ण 55-56 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या शोधासाठी टेनेसीच्या मेम्फिन युनिव्हर्सिटीत फिजिक्सचे प्रोफेसर डॉ. नरहरी अचर द्वारा 2004-05मध्ये केलेल्या शोधात हवाला देखील दिला आहे.