गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (12:29 IST)

होळीला चंद्रग्रहण किती वाजता लागणार?

Lunar Eclipse on Holi 2024
या वर्षी 2024 मध्ये सुमारे 100 वर्षांनंतर होळी चंद्रग्रहणाच्या छायेत आहे. होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळीचा सण साजरा करावा की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल आणि जर आपण उत्सव साजरा केला तर आपण कधी साजरा करावा? चंद्रग्रहण किती काळ राहील? या संदर्भात जाणून घेऊया खास माहिती.
 
पौर्णिमा तिथी प्रारंभ - 24 मार्च 2024 रोजी सकाळी 09:54 मिनिटापासून. या दिवशी होलिका दहन होईल.
पौर्णिमा तिथी समाप्ती - 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:29 मिनिटापर्यंत. या दिवशी धुलेंडी साजरी केली जाईल.
 
- चंद्र ग्रहण प्रारंभ : 25 मार्च 2024 सकाळी 10:24 मिनिटापासून
- चंद्र ग्रहण समाप्त : 25 मार्च 2024 दुपारी 03:01 वाजता
- चंद्र ग्रहण कालावधी : या चंद्रग्रहणाचा कालावधी 4 तास 36 मिनिटे असेल.
- सूतक काळ : हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने सूतक काळ वैध राहणार नाही. जेथे चंद्रग्रहण दिसते तेथे सुतक 9 तास आधी सुरू होते आणि ते मोक्षकाळापर्यंत चालू राहते.
 
आता होळीचा सण साजरा करायचा की नाही या तुमच्या प्रश्नाविषयी जाणून घेऊया: या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल. ज्याला ग्रहणाच्या श्रेणीत धरले जात नाही. केवळ चंद्राचे तेज थोडे कमी होईल, शास्त्रात कोणतेही सुतक मानले जात नाही किंवा त्याचा राशींवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. अशात होलिका दहन 24 मार्च रोजी आणि धुलेंडी 25 मार्च या प्रकारे हा रंगाचा सण साजरा करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र यावेळी होलिका दहनाच्या दिवशी भद्राची सावली असल्यामुळे भद्रा काळ किती काळ असेल ते जाणून घेऊया. यानंतर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी देखील जाणून घेऊया-
 
भद्रा पूंछ- संध्याकाळी 06:33 ते 07:53 मिनिटापर्यंत.
भद्रा मुख- संध्याकाळी 07:53 ते रात्री 10:06 मिनिटापर्यंत.
होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त - 24 मार्च रात्री 11:13 ते 12:27 दरम्यान.
होलिका दहन रात्री होत असल्याने 24 मार्च रोजी रात्री दहन आणि 25 मार्च रोजी धुलेंडी साजरी केली जाईल.