वर्ल्डकपमध्ये पाक इतिहास घडवेल!
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकचा विद्यमान संघ नवा इतिहास घडवेल, अशी आशा माजी कर्णधार इंझमाम उलहकने व्यक्त केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत पाक संघाला भारतावर विजय मिळविता आलेला नाही, पण यावेळी पाकचा संघ भारताला पराभूत करून नवा इतिहास घडवेल, असा विश्वास इंझमामने व्यक्त केला आहे.
या आगामी स्पर्धेतील या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धांमधील सलामीची लढत एललेड येथे होणार आहे.