शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

16 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक

रामेश्वरम- सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून श्रीलंका नौदलाच्या जवानांनी 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली. मच्छिमार संघटनेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्चाथेवू येथे मच्छिमारी करत असताना यांना अटक करण्यात आली. 
 
या आठवड्यात आतापर्यंत श्रीलंकेकडून 44 मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. नौदलाच्या जवानांनी भारतीय मच्छिमारांना घेराव घालत त्यांच्याकडील जाळ्या व बोटीही जप्त केल्या आहेत.
 
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.