शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (10:02 IST)

एका दिवसातच 2 लाख 18 हजार कोटींची कमाई

अलिबाबा या ऑनलाइन विक्री करणार्‍या चिनी वेबसाइटने रविवारी 11 नोव्हेंबरला तब्बल 2 लाख 18 हजार कोटींची कमाई केली. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्राणात विक्री करणारी अलिबाबा ही पहिली चिनी वेबसाइट ठरली आहे.
 
दरवर्षी 11 नोव्हेंबरला चीनमध्ये सिंगल्स डे साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी अलिबाबा आकर्षक डिस्काउंट देते. डायनिंग सेट्‌स, अ‍ॅपलचे मोबाइल अत्यंत स्वस्त दरात या वेबसाइटवर मिळतात. त्यामुळे चीनमधील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावर्षी या वेबसाइटने 22 खर्व रुपयांची विक्री खरेदी केली आहे. या खरेदीत अ‍ॅपलचे आयपॅड, शाओमीचे मोबाइल आणि डायसनच्या विविध वस्तू विकल्या गेल्या आहेत. दरवर्षी ग्राहकांचा उत्साह वाढत असल्यामुळे ही कंपनी पुढच्यावर्षीही अधिक आकर्षक वस्तूंचा सेल ठेवणार आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये बाजारात जाऊन गोष्टी विकत घेण्यापेक्षा ऑनलाइन गोष्टी विकत घेण्याचा ओघ प्रचंड वाढतो आहे. चीनमधील कोसळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढता आयातदर या कशाचाच परिणाम अलिबाबाच्या 'सेल'वर झालेला नाही. दरवर्षी सिंगल्स डे विशेष सेलचे आयोजन करत असतो. यादिवशी ग्राहकांना अत्यंत आकर्षक सवलती दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या सेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे जैक मा यांनी सांगितले.