गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (10:48 IST)

अमेरिकेत सेल्फी घेताना भारतीय दाम्पत्याचा मृत्यू

सेल्फी घेताना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील येसेमिटी नॅशनल पार्कच्या टाफ्ट पॉइंट येथून ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला. विष्णू विश्वनाथ (२९) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी (३०) हे दोघे काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेत फिरण्यासाठी गेले होते. या भारतीय दाम्पत्याने २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले आहे. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. ते सातत्याने आपल्या प्रवासाची माहिती ब्लॉगच्या माध्यमातून लिहीत होते.  त्यांनी पोस्ट केलेल्या ब्लॉगमधील काही छायाचित्रांवरुन ते अतिशय धोकादायक ठिकाणांवरुन सेल्फी घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे.