बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मोबाइल पाण्यात पडल्यावर काय करावे?

पावसाळा आला की पावसात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिला आपला मोबाईल भिजण्याची फार भीती असते. कारण मोबाइल पाण्यात भिजल्यास तो लगेच खराब होतो. त्यामुळे बरेचजण पावसाळ्यात बाहेर जाणेही टाळतात. मात्र, तरीही तुमचा फोन चुकून भिजलाच तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाइल खराब होण्यापासून वाचू शकतो. 
 
फोन पाण्यात भिजल्यावर सर्वात अगोदर फोन बंद करा, जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते.
 
भिजलेला फोन आधी बंद करुन सर्व पार्ट्‌स वेगवेगळे करा. जसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढून कोरड्या कापडावर ठेवा.
 
फोनचे सर्व पार्टस्‌ वेगवेगळे केल्यानंतर त्यांना वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी पेपर नॅपकिनचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल.
 
जर तुमच्या फोनची बॅटरी इनबिल्ट असेल तर बॅटरी काढण्याचा प्रश्नच येत नाही, त्यावेळी तुम्ही फक्त जोपर्यंत मोबाइल स्वीचऑफ होत नाही तोपर्यंत पॉवर बटन दाबून ठेवा.
 
एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याठिकाणी इतर पार्ट्‌स आणि मोबाइल तांदळाच्या प्लेटध्ये ठेऊन वाळू द्या. तांदूळ मोबाइलमधून पाणी शोषून घेते.

या काही टिप्स वापरुन तुम्ही भिजलेला फोन वाचवू शकता.