1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (22:28 IST)

धक्कादायक ! उलटलेल्या टँकरमधून इंधन लुटण्यासाठी आलेल्या 50 जणांचा होरपळून मृत्यू

Shocking! Fifty people who came to loot fuel from an overturned tanker died on the spotधक्कादायक !  उलटलेल्या टँकरमधून इंधन लुटण्यासाठी आलेल्या 50 जणांचा  होरपळून मृत्यू  Marathi International News  In Webdunia Marathi
ही धक्कादायक घटना कॅरेबियन देशात घडली आहे . कॅरेबियन देशातील हैती शहर मधील केप हैतीयन येथे मंगळवारी इंधनाचा टँकर उलटला. सांडलेले तेल गोळा करण्यासाठी शेकडो लोक जमले. हे लोक सांडलेले तेल  कंटेनर मध्ये भरत असताना टँकरला स्फोट होऊन आग लागली.या घटनेत 50 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैतीमध्ये विजेची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे जनरेटरवर लोक जास्त अवलंबून असतात. त्यासाठी इंधन लागते. टँकर उलटल्यानंतर इथून फुकटात तेल घेता येईल असे लोकांना वाटले. दुर्दैवाने, त्याचवेळी स्फोट झाला आणि आग लागली.
कॅप हैतीयन महापौर पॅट्रिक अल्मोर म्हणाले - मी 50 जळालेले मृतदेह पाहिले आहेत. पंतप्रधान एरियल हेन्री म्हणाले - 40 लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती आहे. बहुतांश मृतदेह जळाले आहेत, त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही सध्या कठीण आहे. महापौरांच्या म्हणण्यानुसार - मुख्य रस्त्यावर भरधाव येणारा टँकर उलटला. त्यातून तेल बाहेर पडत होते. ते तेल गोळा करण्यासाठी अनेक लोक लहान कंटेनर घेऊन आले. दरम्यान, टँकरचा स्फोट झाला. या घटनेत 20 घरेही जळून खाक झाली आहेत.