मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (14:49 IST)

ब्राझीलमधील लस घोटाळा, भारत बायोटेकने कोवॅक्सीनच्या लसीचे करार रद्द केले

भारत बायोटेकने ब्राझिलियन औषध निर्माते प्रेसीसा मेडिकामेंटॉस आणि एन्व्हिक्सिया फार्मास्युटिकल्स लिमिटेड सह कोविड -19 च्या लसीच्या व्यवसायात सहकार्य करण्याचा करार रद्द केला. ब्राझीलमध्ये लसी कराराच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हैदराबादस्थित कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
 
 भारतीय कंपनीने ब्राझील सरकारबरोबर कोवॅक्सीन चे 2 कोटी डोस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे करार रद्द करण्याच्या मार्गावर असून तेथील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
 
प्रेसीसा मेडिकामेंटॉस हे ब्राझीलमधील भारत बायोटेकचा भागीदार आहे, जो कंपनीला परवाना देणे, वितरण करणे, विमा आणि लसच्या फेज 3 च्या क्लिनिकल चाचण्यांसहित त्यांच्या कामांमध्ये सल्ला आणि सहाय्य करीत आहे. 
 
कायदेशीर मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात
भारत बायोटेक यांनी शुक्रवारी सांगितले की,"आम्ही त्वरित प्रभावाने सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे. हा करार असूनही कंपनी कोव्हॅक्सिनसाठी नियामकांकडून मान्यता मिळवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करीत आहे. नियामक मंडळासह एएनवीआईएसए काळजीपूर्वक काम सुरू ठेवेल."भारत बायोटेक म्हणाले की ते कायदेशीररित्या विविध देशांमध्ये कोवॅक्सीनची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  
 
20 नोव्हेंबर रोजी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आला
भारत बायोटेकने ब्राझीलच्या बाजारात कोवॅक्सीनच्या विक्रीसाठी 20 नोव्हेंबर, 2020 रोजी दोन्ही कंपन्यांशी करार केला होता. कंपनीने म्हटले आहे की जागतिक स्तरावर कोवॅक्सीन ची  किंमत 15 ते 20 डॉलर दरम्यान ठेवली गेली आहे, परंतु ब्राझिलियन सरकारसाठी ती प्रति डोस 15 डॉलर ठेवली गेली.