शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (19:25 IST)

काय सांगता, महिला देणार 13 मुलांना जन्म

महिलेच्या पोटात वाढणाऱ्या मुलांबद्दल डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून लोक थक्क झाले. एका महिलेचा दावा आहे की तिच्या पोटात एक, दोन नाही तर 13 मुले आहेत आणि ती लवकरच त्यांना जन्म देईल. ही महिला आधीच 6 मुलांची आई आहे. हा अहवाल धक्कादायक असला तरी तो खरा आहे. ही बातमी समजताच महिलेच्या कुटुंबीयांना आणि पतीला धक्का बसला. मेक्सिकोमध्ये अग्निशामक म्हणून काम करणाऱ्या अँटोनियो सोरियानोची पत्नी मारित्झा हर्नांडेझ मेंडेझ यांना आश्चर्यकारकपणे डॉक्टरांकडून गर्भात एकत्र वाढणाऱ्या 13 मुलांची माहिती मिळाली. ही बाब समजताच या जोडप्याला धक्काच बसला. त्यांनी तात्काळ आपत्कालीन कॉलद्वारे स्थानिक नेते आणि लोकांना मदतीचे आवाहन केले. अशा परिस्थितीत या कुटुंबाच्या मदतीसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन नगरसेवक गेरार्डो गुरेरो करत आहेत. कारण एवढ्या मुलांचे संगोपन करण्याचा खर्च खूप जास्त आहे आणि जोडप्याला त्यांचे संगोपन करणे शक्य नाही.
 
पूर्व मेक्सिको शहरातील इक्टापालुका येथे फायरमन म्हणून काम करणारे अँटोनियो सोरियानो हे आधीच सहा मुलांचे वडील आहेत. यापैकी 2 मुलांना जुळी मुले झाली, त्यानंतर तीन मुले एकत्र जन्माला आली. अँटोनियोचे पहिले मूल एकटेच जन्माला आले. आता एकत्र 13 मुलं जन्माला येणार आहेत, त्यामुळे हे जोडपं 19 मुलांचं संगोपन कसं करणार याची चिंता आहे. अँटोनियोची पत्नी मारित्झा खूप चिंतेत आहे, कारण 13 मुलांना एकत्र जन्म देण्याची प्रक्रिया खूप धोकादायक आहे. प्रसूतीदरम्यान महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही डॉक्टर सांगत असले तरी प्रसूती सुखरूप पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॉक्टरांनी दिले.