शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली

इंग्लंडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी 1495 पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. 
 
पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना फोन आला आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली, तेव्हा त्यांना ही गंमत वाटली. 
 
हॅरिस यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी त्यांना 1 हजार 495 पाऊंड दिले. कारच्या या आधीच्या मालकाने म्हटलं आहे की, निळ्या रंगाची ही कार कंजर्वेटिव्ह पार्टीचे नेते डेविड कॅमरन यांना चांगलीच फिट होते, हसताना कारचा आधीचा मालक हॅरिसने म्हटलं आहे, मी नशीबवान आहे की माझ्या गाडीचा रंग लाल नव्हता, जो ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचा रंग आहे.