शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 17 मार्च 2012 (15:08 IST)

ऑलिम्पिक शिष्टमंडळाचे नेतृत्त्व मिशेल ओबामांकडे

WD
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपस्थित राहणार्‍या अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्त्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा करणार आहेत. 27 जुलैला होणार्‍या ऑलिम्पिकच्या उद्‍घाटप्रसंगी मिशेल उपस्थित राहणार असून, यावेळी त्या 'लेट्‍स मूव्ह' या अभियानाचाही प्रसार क रणार आहेत.

तरुणांना नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेण्यास उद्युक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ऑलिम्पिकसाठी उपस्थित राहणार्‍या अध्यक्षीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने करण्याची परंपरा अमेरिकेत आहे.