शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

झाकीर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’वर बांगलादेशात बंदी

ढाका- बांगलादेशची राजधानी ढाका येथे भीषण हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांमधून प्रेरणा घेतली होती, असे समोर आल्यानंतर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’च्या प्रसारणावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. दरमन, भारतामध्येही नाईक यंच्यावर बंदी घातली जाणची शक्यता आहे.
 
ढाका हल्ल्याच्या चौकशीत भारत बांगलादेशला संपूर्ण सहकार्य करत आहे. झाकीर नाईक यांच्या भाषणांमधून ढाका हल्ल्यातील दहशतवादी प्रेरित झाले होते, अशी माहिती पुढे आल्यानंतर भारत सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईस्थित मुस्लीम धङ्र्कगुरू नाईक यांच्या भाषणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, भारतातही पीस टीव्हीविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. भारतात या चॅनेलच्या प्रसारणासाठी परवाना देण्यात आलेला नसला तरी केबल ऑपरेटर्समुळे हा चॅनेल सर्वत्र उपलब्ध आहे.